pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी क्रीडा संकुलास  व निवासी प्रशिक्षण शिबीरास भेट देवून केली पाहणी

0 1 1 8 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.31

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे विविध विकास कामे सुरू झालेली असून या कामास व जिल्हास्त़रीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षण शिबीरास शनिवार दि. 29 जुलै 2023 रोजी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भेट देवून पाहणी केली.

जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथील क्रीडा सुविधाच्या विकास कामास भेट देऊन नियुक्त खाजगी वास्तुविशारद शशी प्रभु ॲण्ड असोसिएटसचे धीरज शर्मा व कंत्राटदार धर्मित घिंया यांच्याशी चर्चा करून विकास कामाचा आढावा घेतला व उच्चतम दर्जाचे काम करण्यास व सुरु असलेल्या विकास कामाची गती वाढविण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा संघटक पी.जे.चाँद, प्रशांत डोली, गणेश विधाते आदिची उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू असलेले जिल्हास्त़रीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षण शिबीरास  जे. ई. एस. महाविद्यालय, जालना येथे सकाळी 10.30 वाजता भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.  मार्गदर्शन करतांनी श्री. पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी त्यांचा दर्जा उंचावून सदर शिबीराचा लाभ जिल्ह्यामध्ये देऊन जिल्ह्यात क्रीडा विकास वाढवावा व क्रीडा संस्कृती रूजवावी असे सांगितले. यावेळी जे.ई.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीचे प्रमोद खरात, क्रीडा संघटक पी.जे. चॉद, प्रशांत नवगिरे, प्रशांत डोली, युवराज गाडेकर, शेख मतीन, नितीन जाधव, योगगुरू डॉ. चेतनकुमार भागवत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4