0
3
2
1
8
2

जालना/प्रतिनिधी,दि.26
शहरातील संभाजीनगर प्रभागातील समर्थ शिक्षण
प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी निधी अजय कुमार
बंसल, पोलीस उपाधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी मानसी आयुष नोपानी यांच्यासह समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका शोभाताई भास्करराव
अंबेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना पांचाळ म्हणाल्या की, शाळा विद्यार्थ्यांना घडविण्याचे सातत्याने प्रयत्न करीत असते. परंतु केवळ
शाळेवरच अवलंबून न राहता संस्कारक्षम अशा या शालेय बालवयात पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष देऊन त्यांच्यावर अत्यंत चांगले संस्कार रुजावेत
यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याकडून
मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्तता व्हावी याकरिता अत्यंत बालवयापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेबरोबरच पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मानवाच्या जीवनामध्ये शालेय जीवनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शाळेमध्ये असतानाच आपल्या व्यक्तिमत्वाला योग्य पैलू पाडून विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अत्यंत नेटक्या
कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल त्यांनी शाळेचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मानसिक समुपदेशक मानसी नोपानी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, प्रत्येक मूल हे मानसिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. त्याच्यावर कुठलाही दबाव येऊ नये
यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करावेत. आपल्या भावना त्याला व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी त्या दाबून ठेवल्यास त्याचे विपरीत परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये दिसून
येतात. बर्याच वेळा विद्यार्थी अभ्यास करतात परंतु अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नैराशाची भावना निर्माण होते. तर अशा या निराशामय वातावरणात पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना समजून घ्यावे व
त्यांना योग्य असे मार्गदर्शन करावे. त्यांचे मनोबल तुटू नये यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कुवत व क्षमता लक्षात घेऊनच पालकांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यातात.चुकीच्या अपेक्षा ठेवल्यास व त्याची पूर्तता न करता आल्यास पाल्याला त्यामुळे निराशा निर्माण होते व पर्यायाने चुकीच्या गोष्टीकडे त्याची पाऊल वळतात. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचे नाते अत्यंत मित्रत्वाचे असावे. प्रत्येक गोष्टीवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी संकोच न बाळगताचर्चा करावी. पाल्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. जेणेकरून विद्यार्थीतणाव मुक्त राहून योग्य प्रकारे मार्गक्रमण करू शकेल. तसेच विद्यार्थ्यांना रोज शारीरिक आयोग आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी योगा, प्राणायाम, ध्यान यासारखे मार्ग अवलंबवावेत.विद्यार्थी व पालकांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शाळेने चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळा व व्यवस्थापनाचे
त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या निधी बंसल यांनीही
विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा
लक्षात घेऊन आतापासूनच चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. पालकांनीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. असे आवाहन करून विद्यार्थ्यांना उज्वल
भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षा शोभाताई अंबेकर यांनीही उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचे
अभिनंदन केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणती ना कोणती कला अवश्य जोपासावी. या कलेच्या माध्यमातून आयुष्य सुखकर होते
असेही त्या म्हणाल्या. तसेच शांतिनिकेतन शाळा ही उत्तरोत्तर चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असून भविष्यातही शाळेच्या वतीने अत्यंत चांगल्या
प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतील. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रितेश मंत्री, संस्थेचे संचालक
प्रा.राम कदम, रामचन्द्र चौधरी,अश्विन अंबेकर, पांडुरंग काळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलता भास्करराव अंबेकर म्हणाले की, शांतिनिकेतन शाळेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील व गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे याकरिता संस्था सातत्याने प्रयत्न करते.तसेच आगामी काळातही शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जेदार
शिक्षण याचबरोबर चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात याकरिता सातत्याने
प्रयत्न करण्यात येतील असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन, भजन, भारुडे,पोवाडे, गवळणी, लोकगीते सादर करून त्यावर यावर बहारदार नृत्य सादर केले.
आपले कलागुण सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे,
माध्यमिकच्या मुख्याध्यापिका, प्रेमला पंडित, यांच्यासह शिक्षक सूर्यकांत बेले, अशोक माधवले मोहन भदाडे, अमोल पवार, गजानन दळवी, अर्चना भालेराव,
शिवराम गिराम, पल्लवी खरात, सुनील जाधव, पुरुषोत्तम चौरे, कीर्ती खैरे,अनिता जाधव, अंबादास घायाळ, संदीप वाखारकर, रमेश गाढवे, सीमा इंगळे,अरुणा मांटे, कांचन वाघ, सुमित्रा शर्मा, रामकिसन मोहिते, स्वाती काकडे,
विद्या चौधरी, गायत्री सूर्यवंशी, किशोर शेळके, संजय खरात, वसंत गाडेकर,कल्याणी काळे, तुकाराम चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
2
1
8
2