pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळा, महाविद्यालयांना पायाभूत सुविधा अनुदान योजनेच्या अर्जासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 20

जिल्ह्यातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका/नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी दि. 30 जून, 2023 पर्यंत अर्ज करण्याची नमूद करून पत्र शासनास शिफारस करण्याचे निर्देश दिले होते. परंतू अल्पसंख्यांक विभागाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असून कागदपत्रांच्या मूळ, साक्षांकित प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे गुरुवार दि.10 ऑगस्ट, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने सन 2023-24 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार असल्याने अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासन मान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका/नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी दि. 30 जून, 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. परंतू आता अल्पसंख्यांक विभागाने अर्ज करण्याची मुदत वाढवून दि.10 ऑगस्ट, 2023 अशी सुधारीत केली आहे. तरी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शाळांनी अर्जासोबत शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांच्या मूळ/साक्षांकित प्रती जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 10 ऑगस्ट, 2023 पर्यंत आहे यांची नोंद घ्यावी. तसेच सदर योजनेच्या अर्जाचा नमूना महाराष्ट्र संकेतस्थळावर शासन निर्णय अंतर्गत तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या (https://mdd.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर योजना-शैक्षणिक अंतर्गत अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तसेच https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2