pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हॕपी मेडिकेअर सेटर ने केला आनंदाचा वाढदिवस साजरा

0 3 8 6 5 4

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.23

येथील धनकवडी भागात गेल्या दहा वर्षापासुन प्रत्येकांच्या आरोग्याच्या त्रासाला बाह्यउपचाराने थेरपीच्या माध्यमातून मुक्त करण्यासाठी “हॕपी मेडिकेअर सेंटर” कार्यरत आहे.या सेंटरमध्ये नुकताच थेरपी लाभार्थी सौ.नलिनी आत्माराम ढेकळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करुन आनंद व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी प्रामुख्याने या सेंटरचे संचालक विकास पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे सौ.ढेकळे यांचेसी संवाद साधुन वाढदिवसा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच सेंटर मधील मार्गदर्शक,मार्गदर्शिका,थेरपी लाभधारक यांनीही शुभेच्छा देऊन उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
प्रारंभी हॕपी मेडिकेअर सेंटरच्या वतीने सौ.नलिनी ढेकळे यांचे पारंपारिक पध्दतीने औक्षण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला..यावेळी थेरपी लाभार्थी आत्माराम ढेकळे यांनी पत्नी सौ नलिनी ढेकळे चा हा आगळा वेगळा वाढदिवस हॕपी मेडिकेअर सेंटरने उत्साहाने साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन, येथे थेरपीमुळे चांगले आरोग्य राहते व जीवनात चांगले शरीरच आपला जीवनसाथी असतो.त्यामुळे सर्वांचे चांगले आरोग्य राहण्यासाठी हॕपी मेडिकेअर सेंटरमधील गोल्ड मॕट व ऍडव्हान्स बेड ची डेमो थेरपी येथील मार्गदर्शनानुसार घेतल्यास शेवट पर्यंत आपले जीवन तणावमुक्त जगता येईल.असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले.थेरेपीच्या वेळेचा सदुपयोग करीत धनकवडी सेंटरच्या मार्गदर्शिका माया मॕडम,सुरेखा मॕडम,प्रिया मॕडम,तेजु मॕडम,स्वाती मॕडम,प्रिती मॅडम ,मार्गदर्शक यशराज माने यांनी उत्कृष्ट आयोजन करुन हा कार्यक्रम यशस्वी केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे