pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाईंदर (पूर्व) येथील इमारत दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत निवेदनाद्वारा माहिती

0 1 1 8 3 4

मुंबई/प्रतिनिधी,दि. 20

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत भाईंदर (पूर्व) येथील नवकीर्ती प्रिमायसेस या इमारतीचा काही भाग आज सकाळी कोसळला. या घटनेत जखमी झालेल्या चार जणांना पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंतच्या प्राथमिक माहितीमध्ये या घटनेतील जीवितहानी संदर्भातील माहिती प्राप्त झालेली नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत यासंदर्भातील निवेदनात सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, या घटनेतील जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींमध्ये इंद्रजित शर्मा (वय 48), जॉर्ज फर्नांडिस (55), हरिशंकर मौर्या (55), अबिद अली (22) या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.
तसेच ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. इमारत खाली करण्यात आली होती. त्या ठिकाणी कुणी रहात नव्हते. येथील तळमजल्यावर दुकाने सुरू होती. घटनास्थळी आयुक्तांसह अग्निशमन दल, रेस्क्यू वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4