जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जि.प. प्रशाला (मुलांची) येथे महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समिती 2025 च्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
11 एप्रिल 2025 रोजी जि.प. शाळेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक जालना शहर मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, लक्ष्मणराव हरकळ, नंदकुमार जांगडे, महेंद्र रत्नपारखे, कार्यक्रमाचे आयोजक तथा महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीचे अमरदिप शिंदे यांच्यासह मिर्झा अन्वर बेग, नगरसेवक महेश निकम, विजय पवार, सोमेश काबलिये, राजेंद्र जाधव, शिवराज नारियलवाले, रोहित बनवस्कर, दिपाली भालशंकर, बाळासाहेब तिडके, ज्ञानेश्वर धानुरे, सोमेश काबलिये, राम अवघड, भागवत राऊत, निलेश वानखेडे, गुरूमीत सिंग सेना, किसन राऊत, भगवान राऊत आदिंची उपस्थिती होती.