जालना ते तिरुपती दरम्यान विशेष गाड्या

जालना/प्रतिनिधी, दि.18
दक्षिण मध्य रेल्वे या पूर्वी नांदेड विभागातून चालवत असलेली जालना -तिरुपती-जालना विशेष गाडी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे –
अनु क्र. गाडी संख्या कुठून-कुठे प्रस्थान आगमन कधीपासून काधीपर्यंत
1 07609 जालना ते तिरुपती 07.00 (सोम) 10.45 (मंगळ) 07.07.2025 30.03.2026
2 07610 तिरुपती ते जालना 15.15 (मंगळ) 15.50 (बुध) 08.07.2025 31.03.2026
1.गाडी क्रमांक 07609 जालना ते तिरुपती विशेष गाडी:
ही विशेष गाडी परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपली, गुंटूर, गुडूर, रेणीगुंठा मार्गे दिनांक 07.07.2025 ते 30.03.2026 दरम्यान धावेल.
2. गाडी क्रमांक 07610 तिरुपती – जालना स्पेशल ट्रेन:
ही विशेष गाडी रेणीगुंठा, गुडूर , गुंटूर, लिंगमपली, विकाराबाद, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे दिनांक 08.07.2025 ते 31.03.2026 दरम्यान धावेल.
या विशेष गाड्यांमध्ये 2 एसी, 3 एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड



