मोर्शी तालुक्यात पांदण रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट होणार सुखद

प्रतिनीधी/मोर्शी,दि.20
मोर्शी : शासनाच्या योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोर्शी तालुक्यात कोट्यावधी रुपयाची पांदन रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.मोर्शी तालुक्यात शासनाच्या किलोमीटरचे पांदण रस्त्यांना मंजुरात मिळाली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 40 ते 45 कामे . उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरित पूर्ण करण्याच्या उद्देशाने राजूरवाडी ग्रामपंचायत शेत पांदन रस्त्याअंतर्गत या आर्थिक वर्षाकरिता पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली पाहिजे. पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखे कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्रसामुग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पांदण रस्ते तयार करण्याचा सपाटा सुरू करण्यात यावा अती विनंती परिसरातील नागरिकांनी केली आहे.मोर्शी तालुका असून शेतातील पीक काढण्याकरिता मोठे वाहन शेतात नेण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी पांदण रस्त्याची मोठी अडचण निर्माण होत असून बैल बंडी व वाहन शेतामध्ये नेण्यास अडचण निर्माण होत आहे. असल्यामुळे शेतकऱ्यांना वहिवाटी करिता मोठया प्रमाणत दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी तक्रारीच्या भानगडीत न पडता आपला पांदण रस्ता कसा पूर्णत्वात जाईल याकडे लक्ष द्यावे व काही तक्रार करून पांदन रस्त्याचे काम थांबविणाऱ्या विघ्नसंतोषी समाजसेवकापासून सावध राहून चांगल्या दर्जाच्या पांदण रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन आमदार राजेश वानखडे यांनी केले आहे.