pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम

  दीड महिन्यात अनेक गुन्हे दाखल; लाखांचा मुद्देमाल जप्त

0 1 7 9 4 6

जालना/प्रतिनिधी,दि.8

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूची अवैध तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली असून जालना जिल्ह्यात तीन पथकांमार्फत तस्करांवर करडी नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 161 गुन्हे दाखल करण्यात आले 142 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 24 लाख 38 हजार 775 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती जालना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण सहा देशी मद्य ठोक विक्रेत्यांकडे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात सीएल-II (देशी मद्य ठोक विक्रेते), एफएल-1 (विदेशी मद्य ठोक विक्रेते) तसेच 02 फॉर्म-आय युनिट (स्पिरिट निर्मिती घटक) यांच्यावर सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जात असून किमान दहा दिवसांचा बॅकअप ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. असे डॉ. पराग नवलकर यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहिता कालावधीत दि.7 मे पर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 161 गुन्हे नोंदविण्यात आले. यात 140 वारस गुन्हे असून 142 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन, एकुण 7 वाहने जप्त केलेली आहे. सदर केलेल्या कारवायांत संशयितांकडून (813.24 लिटर देशी) ( लिटर विदेशी), (115.59 लिटर बिअर,) (1234 लिटर हातभट्टी), (341 लिटर ताडी) 298.65 (18400 लिटर रसायन) असा एकुण 20518.19 लिटर सर्व प्रकारचे मद्य असे वाहनाच्या किंमतीसह एकूण 24 लाख 38 हजार 775 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मद्य तस्करी करणाऱ्या सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्याचा सूचना निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. या आरोपींवर कलम 93 अंतर्गत कारवाई करून बंधपत्रांचे उल्लघंन झाल्यानंतर सदरील आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्रेत्यांनी प्रत्येक दिवशी होणारी मद्यविक्रीची माहिती अद्यावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून ही माहिती विभागीय स्तरावर संकलन करण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म) आणि औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यांत अवैध दारू निर्मिती व विक्री होणार नाही याबाबत विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.

तीन दिवस राहणार ड्राय डे

18-जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान होत असून मतदानापूर्वी 48 तास अगोदर शनिवार दि.11 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते दिनांक 13 मे 2024 रोजी मतदानाचा पूर्ण दिवस मतदान प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत 18-जालना लोकसभा क्षेत्रात जालना जिल्हयातील सर्व अनुज्ञप्ती बंद राहील. तसेच जालना जिल्हयातील परंतु 17-परभणी लोकसभा क्षेत्रातील अनुज्ञप्त्या सुरु राहील. 18- जालना लोकसभा क्षेत्रा लगतच्या सिमे पासुन 5 कि.मी. अंतरातील सर्व अनुज्ञप्त्या वरील कालावधीत बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले असल्याचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी सांगितले. तसेच सर्व अबकारी अनुज्ञप्त्या या प्रत्यक्ष जागेवर जावून लाखेद्वारे सिलबंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणीही अनुज्ञप्तीधारक हे गैरप्रकारे उघडण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

शीघ्र पथकास (क्यु.आर.टी.) माहिती कळवावी

अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर भरारी पथकांमार्फत करडी नजर ठेवली जात असून तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या जालना कार्यालयात शिघ्र पथकाची (क्यु.आर.टी.) स्थापना देखील करण्यात आली आहे. जंगल व इतर ठिकाणी हातभट्टी दारूची निर्मिती केली जाते, उत्पादन शुल्क विभागाकडून धाडी टाकून उध्वस्त केल्या जात आहेत. विभागीय निरीक्षक आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत गस्त घालून अवैध मद्य विक्री, वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे नमूद करत जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य विक्री, वाहतूक अथवा बनावट मद्य निर्मिती होत असल्याचे आढळल्यास 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर अथवा excisesuvidha.Mahaonline.gov.in विभागाच्या या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. असे आवाहन अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे