pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.23 

 जवाहर नवोदय विद्यालय अंबा-परतूर लॅटरल एन्ट्री निवड चाचणी वर्ग 9 वी आणि वर्ग 11 वी करिता जालना जिल्ह्यातील इयत्ता 8 वी आणि 10 वी वर्गात शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह सेवाकेंद्रावरून व इतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025अशी होती. प्रशासकीय कारणास्तव ही मुदत वाढवून दिनांक 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे.

                तरी इच्छुक विद्यार्थी,पालक,शिक्षक व मुख्याध्यापकांनी ह्याची नोंद घ्यावी.ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फोटो, स्वाक्षऱ्या हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून वर्ग नववी साठी https://cbseitms.nic/2025/nvsix 9” या संकेतस्थळावरून व अकरावी साठी https://cbseitms.nic/2025/nvsxi ११ या संकेतस्थळावरून भरावेत.जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे अर्ज भरण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे