सिने अभिनेते हास्य कलाकार आशिष सातपुते यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार 2024 जाहीर….
प्रसिद्ध सिने अभिनेत्री मेघा डोळस यांच्या शुभ हस्ते मिळणार पुरस्कार......
जालना/प्रतिनिधी, दि.11
सिने अभिनेते आशिष पुंडलिक सातपुते यांचे कला शेत्रात खूपच उल्लेखनीय काम चालू आहे.. सध्या या सोशल मीडिया धावपळीत हास्य कलाकार बरोबर ऐक उत्कृष्ट निवेदक, नकलाकार, जादूगार म्हणून ऐक वेगळी ओळख निर्माण झाली आहे तर महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमातून आशिष भाऊ जी या नावाने देखील महाराष्ट्र भरात जोरदार चर्चा सुरू आहे.. प्रंचड प्रतिसाद मिळत असल्यामुळं आशिष सातपुते फार कमी वेळात सोशल मीडियावर तसेच you tube माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर ऐक वेगल स्थान निर्माण केलं आहे.. तसेच सुरुवात मराठी मालिका लक्ष,पंचनामा,राधा हि बावरी, पिंकी च विजय असो,लाव रे तो व्हिडिओ या मालिकेतून प्रेक्षकांनी अभिनयाची भर भरून दाद दिली,या सर्व कामाची दखल घेत तेजस फाउंडेशन नाशिक यांनी या वर्षीचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार आशिष सातपुते यांना जाहीर केला आहे.. सदर पुरस्कार यांना येत्या जुन महिन्यात संभाजी नगर येथे प्रसिद्ध सिने अभिनेत्री मेघा डोळस यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे…