pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

0 3 0 5 6 3

जालना/प्रतिनिधी,दि.30

जिल्हा युवा पुरस्कार हा युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतींना रोख रक्कमेसह गौरवपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येते. मागील पाच वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी विहीत नमुन्यातील अर्जासह आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह शुक्रवार दि.10 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रॅस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी रोख रक्कम, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष 2019-20 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2018 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2020-21 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2021-22 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2020 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2022 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. वर्ष 2022-23 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2021 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 0 5 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे