pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन.

0 1 7 4 1 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवावे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाच्या उच्च पदावर जाऊन कार्य करता येते. सामाजिक बांधिलकी सोबत देशसेवाही घडते. त्यामुळे अशी सुवर्ण संधी कोणीही चुकवू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवा व महाराष्ट्राचे नाव उज्वल करा असे आवाहन गृहनिर्माण संस्था उरणचे सहाय्यक निबंधक राजेंद्र गायकवाड यांनी केले.

 

उरण नगरपरिषदचे माँसाहेब मिनाताई ठाकरे सार्वजनिक वाचनालय येथे मा. महेंद्र कल्याणकर कोकण विभागीय आयुक्त यांची संकल्पना आणि उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल संतोष पवार यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते.शनिवार, दि. १०/६/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा. एमपीएससी, तलाठी भरती, वन रक्षक भरती या स्पर्धा परीक्षे संदर्भात राजेंद्र हनुमंत गायकवाड, सहाय्यक निबंधक गृहनिर्माण संस्था, उरण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .यावेळी राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, नेमका अभ्यास कसा करावा. कोणकोणती पुस्तके अभ्यासावी, स्पर्धा परीक्षेत कशा पद्धतीने यश मिळवावे या विषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले.या व्याख्यानाचे वैशिष्ट्य असे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त कृतीयुक्त सहभाग घेतला . त्यामुळे व्याख्याते आणि विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.या शिबिरानिमित्त लाभलेले मुख्य व्याख्याते राजेंद्र हणमंत गायकवाड सहाय्यक निबंधक , उरण यांना ग्रंथपाल संतोष पवार आणि ग्रंथालय सहाय्यक जयेश वत्सराज , पत्रकार विठ्ठल ममताबादे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जुवेकर आणि उपस्थित विद्यार्थी यांच्या शुभहस्ते झुंज क्रांतीवीरांची हे पुस्तक आणि कुंडीसह रोपटे देवून सन्मानित करण्यात आले. याच वेळी उरण तालुक्यातील महिला पोलीस म्हणून ज्यांची निवड झाली त्या मिनल जयेश घरत , आणि निकीता पिंगळे, विद्यार्थ्यांमध्ये कु. युक्ती सुनील भोईर, कोटनाका-उरण (ईयत्ता १० वी गुण ९३%) यांनाही सन्मानित करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून स्पर्धा परीक्षांकडे निश्चित आपल्या भागातील विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे याबाबत समाधान व्यक्त करत ग्रंथपाल संतोष पवार यांनी आज उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या सहकार्याने बहुतांश स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके माँसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय उरण येथे उपलब्ध आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्या असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले.एकंदरीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे