pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. अण्णासाहेब पाटील यांची भाजपा जिल्हा कार्यालयात जयंती साजरी

0 3 2 1 8 4

जालना/प्रतिनिधी,दि.25

भारतीय जनसंघ पार्टीचे सह संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती (आज २५) रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे साजरी करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करून प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना महानगराध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी मार्गदर्शन करताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर ज्यांनी जनसंघाची धुरा सांभाळली व समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा विचार करून अंत्योदयाची संकल्पना मांडली आणि त्याच मार्गावर आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे भारतीय जनता पक्ष तळागाळात पोचला त्या दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त शतशः नमन, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे संघटन कौशल्य अंगीकृत करून व दीनदयाळ यांचे जीवन चरित्र वाचून व आपल्या जीवनात दीनदयाळ यांचे विचार आचरणात आणल्यास त्यांचे जीवन आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही.

त्याचबरोबर स्व. अण्णासाहेब पाटील हे सामाजिक चळवळीतील आमचे प्रेरणास्थान अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगार कायद्याचे जनक प्रखर कामगार नेते, मराठा समाजाच्या व शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या प्रश्नावर मुंबईत प्रंचड मोठा मोर्चा काढल्यानंतर हि तत्कालीन राज्य शासनाने संवेदनशील दाखवला नाही म्हणून समाजासाठी आपले बलिदान देणारे नेतृत्व कै. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्वाभिमानी पावन स्मृतीस विनम्र अभिवादन असे त्यांनी बोलतांना सांगितले

यावेळी महानगर उपाध्यक्ष धनराज काबलीये, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, अमोल कारंजेकर, दिपाली बिन्नीवाले, रोषण चौधरी, बबनराव सिरसाठ, जालना तालुकाध्यक्ष वसंत शिंदे, बाबुराव भवर, सुधाकर खरात, राजू गवई, सय्यद इम्रान, डोंगरसिंग साबळे, आनंद झारकंडे, सतीशचंद्र प्रभू, मुकेश चव्हाण, विकास कदम, शिवाजी गवारे, शाम जाधव, रवि कायंदे, मनोज बिडकर, अमन मित्तल, नागेश अंभोरे, सतीश अकोलकर, नीळकंठ कुलकर्णी, संतोष खंडेलवाल, कैलास पवार, गोविंद ढेंबरे, अशोक वाघ, सुदर्शन काळे, निवृत्ती लंके, भगवान चांदोडे, करण निकाळजे, राजू उगले, रोहित नलावडे, रमेश गोगडे, महेंद्र अकोले, कृष्णा इंगोले, गौरव गोधेकर, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, विठ्ठल नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे