लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 22 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

जालना/प्रतिनिधी,दि. 21
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे बुधवार, दि. 22 मे 2024 रोजी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सकाळी 8.55 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता सॅफरॉन हॉटेल, जालना येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता सॅफरॉन हॉटेल येथून गुरु गणेश तपोधाम, जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.35 वाजता गुरु गणेश तपोधाम येथे आगमन व आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.25 वाजता गुरु गणेश तपोधाम येथून महेश भवन, मंठा रोड, जालनाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता महेश भवन, मंठा रोड, जालना येथे आगमन व आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.25 वाजता महेश भवन येथून चित्रकूट बंगला, भोकरदन रोड, जालनाकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता चित्रकूट बंगला येथे आगमन व राखीव दुपारी 2.30 वाजता चित्रकूट बंगला, भोकरदन रोड, जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळकडे ते प्रयाण करतील