pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर समाजाच्या अडी अडचणी विषयी पाठपुरावा करणार श्री.रामदास दादा कोळेकर

0 1 7 4 0 5

आनिल वाढोणकर/छ.संभाजीनगर,दि.16

टाकळी खुर्द येथे मल्हार महासंघ शाखा उद्घाटन सोहळा कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर यांनी सांगितले आहे की मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बांधवांना शास्त्र परवानगी देण्याबाबत तसेच आरक्षणा बाबत धनगर समाजाला संघटित करून समाजांच्या अडचणी विषयी शासन दरबारी पाठपुरावा करणार तसेच गाव तिथे मल्हार महासंघ शाखा संकल्पना राबविणार असल्याचे प्रतिपादन मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी कोळेकर यांनी केले टाकळी खुर्द येथे मल्हार महासंघ शाखा उद्घाटन सोहळाप्रसंगी ते बोलत होते धनगर समाजाच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास दीड लाख मेंढी मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येईल असा इशारा रामदासजी कोळेकर यांनी दिला याप्रसंगी मल्हार महासंघाचे प्रदेउपध्यक्ष संतोष जी थोरात प्रदेश संघटक रामेश्वर लव्हाळे मराठवाडा अध्यक्ष संजय फटाकडे मराठवाडा प्रमुख आनिल वाढोणकर मराठवाडा संपर्कप्रमुख आजिनाथ खिल्लारे मराठवाडा महिला आघाडी प्रसिद्ध प्रमुख मीराताई जानराव जिल्हाध्यक्ष गजानन साबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविता ताई शिंदे आणपूर्णा सोनाग्रे धोंडीराम खिल्लारे विनोद जेटे बाजीराव जेटे श्रीरंग जेटे दत्ता जेटे काकासाहेब खिल्लारे उत्तम खिल्लारे भागिनाथ गोरे रेवनाथ जेटे राजू जेटे बालु जेटे माजी जेटे तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त समाज बांधवांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे