pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ती’ पोलिसांत अन् ‘तो’ उडी टाकण्यासाठी सहाव्या माळ्यावर:‘बीडीडीएस’चे पोलिस जवान कमलेश शिंदे यांनी वाचवले तरुणाचे प्राण

0 3 8 3 5 2

मोर्शी ता./ प्रतिनिधि,दि.30

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक २१ वर्षीय तरुणी तिच्याच परिचित तरुणाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली. दोन वर्षे मैत्रीचे संबध ठेवून आता तिने बोलचाल बंद केली. ती आता दुसऱ्या तरुणासोबत बोलते आणि तीच तक्रार देत आहे, ही बाब २४ वर्षीय तरुणाला कळताच त्याने पुंडलिकबाबा नगरातील एका सहा माळ्याच्या इमारतीवर चढून उडी टाकली. मात्र त्याचवेळी या परिसरातीलच शहर पोलिस दलात बीडीडीएसला कार्यरत जवान कमलेश शिंदे यांनी या तरुणाला उडी टाकल्यावर पकडले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते साडेसहाच्या सुमारास घडली आहे.
मूळचा मोर्शी येथील २४ वर्षीय तरुण शिक्षणासाठी शहरात भाड्याने खोली करून राहतो. दोन वर्षांपूर्वी शहरातील एका तरुणीसोबत त्याची मैत्री व नंतर प्रेमसूत जुळले. त्या काळात ते दोघे सोबत फिरायचे, बोलायचे सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र मागील काही दिवसांपासून ती तरुणी ‘इग्नोर’ करू लागली. दरम्यान तरुण बोलण्यासाठी आग्रह करतो, तो त्रास देतो असे म्हणून तरुणी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी सोमवारी सायंकाळी
तरुणीला केला व्हिडीओ कॉल तरुण इमारतीवर उडी मारण्यासाठी गेल्यानंतर त्याने तरुणीला व्हिडीओ कॉल करून उडी मारणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तरुणी पोलिस ठाण्यातच होती. तिने तत्काळ हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे पोलिस तातडीने तरुण चढलेल्या इमारतीजवळ पोहोचले होते.तरुणी तक्रार देण्यासाठी ठाण्यात आली होती ^२१ वर्षीय तरुणी २४ वर्षीय तरुणाविरुद्ध तक्रार देण्यासाठी ठाण्यात आली होती. त्याचवेळी तो तरुण उडी मारण्यासाठी सहा माळ्याच्या इमारतीवर चढला. त्यावेळी पोलिस जवान शिंदे यांनी त्याला पकडल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे. अतुल वर, ठाणेदार, गाडगेनगर पोलिस ठाणे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे