नेहरू विद्यालय गोलापांगरी येथे बाबासाहेब आप्पा मोरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.15
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या दिनानिमित्त आज गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळ गोलापांगरी अंतर्गत, नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सकाळी साडेसात वाजता गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आप्पा मोरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संचालक मंडळ डी.के.अण्णा मोरे पाटील, आर.एस. अण्णा मोरे पाटील, एस. वाय. खडेकर अण्णा व इतर प्रतिष्ठित नागरिकांची, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक आत्माराम मोरे सर, सर्व सहकारी बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, माजी कर्मचारी वर्ग, पत्रकार व माता,भगिनी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणा नंतर विद्यार्थ्यांची शिस्तीत क्रांतिवीरांच्या व महापुरुषांच्या जय घोषात– स्वातंत्र्य दिन चिरायू होवो मेरा भारत महान महात्मा गांधी की जय* प्रभात फेरी काढण्यात आली.
शालेय कार्यक्रमांतर्गत व शासकीय परिपत्रकानुसार माजी सैनिक १) बी. एस. मोरे
२) रमेश रामभाऊ
पाटेकर
३) संजयजी देव्हडे
यांचा संस्थेच्या वतीने संचालकांनी मंडळांनी यथोचित मान सन्मान करून त्यांना मानवंदना दिली. शाळेचे पर्यवेक्षक आत्माराम मोरे सर यांनी या तीनही माजी सैनिकांचा विद्यार्थ्यांसमोर इतिहास उलगडला. अनेक यशवंत विद्यार्थी यांचा तसेच शिक्षक बंधू यांचा वाढदिवस
साजरा करण्यात आला. ठाकरे सरांच्या हरित सेनेच्या पुस्तकीचे प्रकाशन करण्यात आले, तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खेळाची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक शैक्षणिक साहित्य आज शाळेला भेट दिले तर श्री टी.एस.मोरे सर यांच्या आठवी क वर्गाकडून सांस्कृतिक विभागाला महापुरुषांचे फोटो भेट म्हणून दिले.
श्री ठाकरे सर यांनी आपल्या संचलनीय मनोगतात देशाचे स्वातंत्र्य साजरे करताना त्या मागचा इतिहास, असंख्य आहूत्या
चळवळी, आंदोलन आणि एकूणच इतिहास आपल्यातील प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्या देशाचे स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील बंधू , भगिनींनी किती त्याग केला, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेक देशोधडीला लागले, अनेक महापुरुषांना तुरुंगात जावं लागलं, इंग्रजांचा लाठीमार सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर महात्मा गांधी, भगतसिंग,पं. नेहरू,सुभाषचंद्र बोस,चंद्रशेखर आझाद,या आणि अशा क्रांतिकारी स्वातंत्र सैनिक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले आपल्या देशासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. तेव्हा कुठे 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र टिकून ठेवणे, देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता याची ज्योत पेटवून ठेवणं हे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.तरअनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्याची प्रेरणा, चेतना जागृत केली.
हरित सेनेच्या माध्यमातून नवीन केलेली गुलाब बाग यांचेही आज आदरणीय संचालक मंडळ व मुख्याध्यापिका यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ठाकरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.