प्रतिभा माध्यमिक विद्यालयात एसटीच्या मोफत पास चे वाटप

बदनापूर/प्रतिनिधी, दि.24
आज (दि. 23) रोजी जालना परिवहन मंडळ अंतर्गत आज बदनापूर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयात ‘अहिल्याबाई मोफत पास’ व ‘मानव विकास मोफत पास’ अंतर्गत शाळेतील मुलींना परिवहन महामंडळ मोफत बसेस चे पास वाटप करण्यात आले आहे. यावेळी 70 मुलींना एसटी महामंडळाचे पासेस वाटप करण्यात आले आहे. यावेळी एस टी महामंडळाचे अधिकारी श्री राठोड साहेब तसेच लकडे साहेब यांच्या हस्ते मुलींना पासेस वितरित करण्यात आले.
यावेळी शाळेच्या वतीने राठोड साहेब यांचे स्वागत शाळेचे सहशिक्षक श्री पठाण सर यांच्या हस्ते तर लकडे साहेब यांची स्वागत श्री भगवान धनगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेची सहशिक्षक दत्तात्रय मुळे, सुनील पाटील, प्रवीण गावडे, लक्ष्मण कुऱ्हाडे, मिलिंद उनवणे,योगेश टेके, शिंदे मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक परजने, प्रभाकर कोळेकर, अरुणा शेरे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, विद्यार्थी हजर होते



