pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री गोपाळकृष्ण वाचनालयात कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ.

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षांचा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने “मेरी माटी मेरा देश” या एका नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे.या उपक्रमाअंतर्गत
१) अमृत सरोवर / जल स्त्रोताशेजारी/ शालेय प्रांगणात शिलाफलकम उभारणी
२) पंचप्रण शपथ व सेल्फी
३) वसुधा वंदन
४) वीरोंका नमन
५) ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम राज्यभर राबविले जात आहेत.प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योध्दांच्या समर्पणाचे स्मरण करणे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर अभियाना अंतर्गत शासन निर्णयाचे पालन करत बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता उरण तालुक्यातील श्री गोपाळकृष्ण वाचनालय देऊळवाडी, उरण शहर येथे श्री गोपाळकृष्ण वाचनालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी पंचप्रण शपथ घेतली.यावेळी जिजा घरत -ग्रंथपाल,अंजली कालेकर -सहाय्य्क ग्रंथपाल,वृषाली पाठारे -लेखणीक,मीनाक्षी मुकादम -शिपाई तसेच उरण नगर परिषदेचे कर्मचारी जयेश वत्सराज, वीणा वत्सराज,ऋतुजा वत्सराज,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल ममताबादे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी देशाप्रती आदरभाव बाळगत पंचप्रण शपथ घेतली.भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करू.गुलामीची मानसिकता गूळापासून नष्ट करु.देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु.भारताची एकात्मता वलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू.देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.असे एकूण पाच शपथ (पंचप्रण शपथ )घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल ममताबादे यांनी तर आभार प्रदर्शन जिजा घरत यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे