संभाजीनगर येथे आयोजित मूल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.14
मुल्यसंस्कार मेळावा आयोजन समिती, संभाजीनगर यांच्या वतीने दिनांक 26 .11.23 व 27 11.2023 रोजी “मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा” आयोजित करण्यात आलेला आहे.दिनांक 27.11.23 रोजी नियोजित मेळाव्यास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक, यांचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे उपस्थितींना मार्गदर्शन लाभणार आहे.”आई-वडील हे पहिले गुरु” ही भारतीय संस्कृतीने दिलेली आदर्श शिकवण समाजामध्ये रुजवण्यासाठी या मूल्यसंस्कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी भव्य दिव्य मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न होणार आहे.दिनांक 26.11.23 रोजी या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध माहितीपूर्ण अशी ज्ञानदालने उभारण्यात येणार आहेत ज्यामध्ये पालक पाल्य समुपदेशन, कृषी, आयुर्वेद, आहार-आरोग्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, प्राचीन वेद विज्ञान, सण-वार-व्रते यांचा समावेश आहे.या ऐतिहासिक मेळाव्याचे भूमिपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको वाळूज महानगर -1, पाण्याच्या टाकी जवळ, तिसगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले.या नियोजित मेळाव्यास सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समिती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे