महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडून उद्योजकांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 22
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे रॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी डिजीटल लोन ॲप्लिकेशनची एक दिवसीय आणि फायनान्शियल नॉलेजबाबत दोन दिवसीय तसेच स्किल डेव्हलपमेंटबाबत पाच दिवसीय कार्यशाळा जालना जिल्हा परिषदेतील कृषी भवन सभागृहात दि.24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमसीईडीचे विभागीय अधिकारी डी. यु. थावरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संबंधितांकडे उद्योग आधार, आधार कार्डसह दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे असणे आवश्यक आहेत. सर्व कार्यशाळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा निः शुल्क असुन कार्यशाळेमध्ये तज्ञ व्याख्याताद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक सुरेखा मोरे (मो. 9545258681) यांच्याशी किंवा विनोद तुपे 02482-220592 यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.