शिक्षण :प्रश्न अनेक – उत्तर एक गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा दिमागदार उत्साहात संपन्न!

जालना/प्रतिनिधी, दि 29
मराठवाडा शिक्षक संघ जालना आयोजित केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे निमित्ताने शिक्षण प्रश्न अनेक – उत्तर एक या पुस्तकाचे विमोचन येथील मुक्तेश्वर लॉन्स सांस्कृतिक सभागृहामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा सुधाकर आडबाले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. शिक्षकांच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्यासाठी व शिक्षकांच्या व्यापक हितासाठी मागील 35 वर्षापासून सातत्यपूर्ण केलेल्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून शिक्षण क्षेत्रातील कळीच्या प्रश्नावर मान्यवरांच्या लिखाणाच्या माध्यमातून व्यापक पातळीवर चर्चा करावी या सद हेतूने प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन व श्री ज्ञानोबा वरवटे सेवा गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केला होता या पुस्तकाचे संपादन प्रा पुरुषोत्तम जुने व सहसंपादन जेष्ठ अर्थशास्त्र तज्ञ प्रा मारुती तेगमपुरे यांनी केले आहे या पुस्तकात 19 प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ विचारवंत व शिक्षण तज्ञ यांचे लेख आहेत शिक्षणाविषयी असलेले ज्वलंत प्रश्न व त्यावरील उपाय नक्कीच या पुस्तकातून वाचकांना वाचायला मिळतील असे भाष्य प्रसिद्ध साहित्यिक तथा लेखक प्रल्हाद लुलेकर यांनी केले यावेळी केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव सरचिटणीस राजकुमार कदम यांची समायोजित भाषणे झाली तर सत्कारमूर्ती ज्ञानोबा वरवटे यांनी सत्काराला उत्तर देताना मी माझे उर्वरित आयुष्य संघटनेसाठी तसेच शोषित,पीडित वंचित तसेच अन्यायग्रस्त शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित करेल अशी मनीषा व्यक्त केली मराठवाडा शिक्षक संघाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतचा इतिहास संघटनेने आजपर्यंत दिलेली आमदार व त्यांनी केलेले कार्य यांचा आढावा अध्यक्ष रमेश आंधळे यांनी आपल्या समारोपीय भाषणात घेतला कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव संजय येळवंते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीकार्यकारणी सदस्य आरेफ कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष भीमा शंकर शिंदे,जगन वाघमोडे, सहसचिव गणेश चव्हाण, प्रद्युम्न काकड , तालुका अध्यक्ष रमेश गाढे, गणेश मेहेत्रे, सुधाकर डोईफोडे, जनार्दन कुदर, संजय चव्हाण व प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल,भगवान धनगे यांनी प्रयत्न केले


