यश इंग्लिश स्कूल,नेवरी येथे महिलांच्या विविध स्पर्धा

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.21
यश इंग्लिश स्कूल, नेवरी. येथे दि.20/01/24 शनिवार रोजी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता .या कार्यक्रमाची सुरवात विद्यची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.नंतर प्रत्येक महिलांनी उखाण्यातून आपला परिचय दिला.त्यानंतर ज्ञान,संस्कारचे आपुलकीने वाण देण्यात आले व महिलांच्या खेळाला सुरवात झाली या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे, तळ्यात – मळ्यात स्मरनशक्ती इ. खेळाचे आयोजन करण्यात आले होते,
या खेळामध्ये सर्व महिलांनी उत्सपूर्तपने सहभाग घेतला होता.त्यातून पल्लवी नागेश येवले,कोमल सुनिल कदम,नेहा मारोती घुने,मंगल सुधाकर शिंदे,संगीता शिवशंकर शिंदे ,प्रियंका दयानंद वाघमारे व प्रांजली बबलु इंगळे ..या महिलांनी नंबर पटकवले.विजय महिलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा नेवरकर मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोनाली पेंढारकर मॅडम यांनी केले.तर सूत्रसंचालन काजल गाढे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रीना आमदरे मॅडम,शितल खंदारे मॅडम,शारदा पेंढारकर मॅडम,कांचन खिराडे ताई यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला आलेल्या महिलांचे आभार शितल वाघमारे मॅडम यांनी मानले.