भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी

जालना/प्रतिनिधी,दि.14
भाजपा जिल्हा कार्यालय, जालना व मस्तगड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांनी प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी भास्करआबा दानवे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले महामानव आहेत. भारतीय लोकशाही बलशाली झाल्याशिवाय भारतीय समाज आणि पर्यायाने भारत देश बलशाली होणार नाही हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवरच भारत देशाचा कारभार चालत असल्यामुळे जगामध्ये भारतीय लोकशाहीला फार महत्वाचे स्थान दिले जाते ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच अशा महा महामानवास जयंती निमित्त अभिवादन करतो असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, सोपान पेंढारकर, अतिक खान, सुनील खरे, राजेंद्र भोसले, मुकेश चव्हाण, गोविंद ढेंबरे, डोंगरसिंग साबळे, अनिल सरकटे, महादेव कावळे, अमोल कारंजेकर, सुभाष सले, गोवर्धन कोल्हे, सय्यद इम्रानम, सुदर्शन काळे, समर्पण विजयसेनानी, संतोष राजकार, विकास कदम, बाबुराव भवर, माणिक फड, जुनेद मिर्झा, जगदीश येनगुपटला, शाम जाधव, दिगंबर सातपुते, विशाल उफाड, किशोर सवडे, अकबर परसूवाले, विठ्ठल नरवडे, शरद आम्ले आदींची उपस्थिती होती.