pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंचा गुणगौरव क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जातील – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  

0 1 1 8 0 9

जालना/प्रतिनिधी,दि. 29

जिल्ह्यात खेळाकरीता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.  तर मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जालना जिल्ह्यातुन प्रतिभावान खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय  क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद व नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे जालना  जिल्ह्यातील विविध खेळांचे क्रीडा संघटक, क्रीडा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडूंचा गुणगौरव सोहळा देवगिरी इंग्लीश स्कूल येथे  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास हॉकी महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रा. दिनकर थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, अरविंद देशमुख, गायत्री सोरटी आदीसह क्रीडा संघटक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मार्गदर्शक व खेळाडुंचा गौरव करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 9