pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

निखिल दिपक ठाकूर यांचे दुःखद निधन

0 1 7 4 1 4

उरण /विठ्ठल ममताबादे,दि.24

उरण तालूक्यातील भेंडखळ येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल दिपक ठाकूर (वय ३३ वर्षे) यांचे दिनांक २१/१२/२०२३ रोजी अपघातात डोक्याला मार लागल्याने दुःखद निधन झाले आहे.भेंडखळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक ठाकूर, माजी सरपंच संध्या ठाकूर यांचे ते पुत्र होते. निखिल ठाकूर हे कोपरखैरणे एमएसईबी कार्यालयात सिनिअर टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. एकूण १३ वर्षे त्यांची ही सेवा झाली. काँग्रेस प्रणित इंटक संघटनेचे वाशी झोनचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला. वाशी नवी मुंबई मधील एमजीएम प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मावळली.आई, वडील,पत्नी,१ मुलगा,१ मुलगी असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. निखिल ठाकूर यांचा दशक्रिया विधी शनिवार ३०/१२/२०२३ रोजी सकाळी ८ वा. नाना नानी पार्क खोपटे येथे तर उत्तर कार्य विधी मंगळवार दि २/१/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी भेंडखळला येथे होणार आहे. या दुःखद प्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे ठाकूर परिवारामार्फत कळविण्यात आले आहे. निखिल ठाकूर यांच्या अचानक निधनाने त्याचे मित्र परिवार, भेंडखळ ग्रामस्थ व ठाकूर परिवारात शोककळा पसरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे