pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयाच्या कु. रूपाली सपकाळ ची पीएसआय पदी निवड.

0 1 2 1 0 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची कु. रूपाली सोनू सपकाळ या विद्यार्थिनीची एम.पी.एस.सी द्वारे झालेल्या परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे महिला प्रवर्गातून ती महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. उरण महाविद्यालयाची ती इतिहास विषयाची पदवीधर विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड, के.ए.शामा, डॉ. ए.आर चव्हाण, डॉ.एम.जी लोणे, डॉ.दत्ता हिंगमिरे, टी. एन घ्यार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामध्ये तिचे आई-वडील,मामा व शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले असे तिने सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 7