pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना

0 1 7 4 1 2

जालना/प्रतिनीधी,दि.29

आंतरराष्ट्रीय पिथीयन कॉन्सीलच्या अंतर्गत संस्थापक बिजेंदर गोयल यांच्या आदेशान्वये व ध्यानचंद भोला व लक्ष्मण सर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना करण्यात आलेली आहे.
कॉन्सीलच्या अध्यक्षपदी शेख चाँद पी.जे., उपाध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत वर्मा, श्रीमती वैशाली सरदार, श्रीमती गायत्री सोरटी, सचिव सचीन आर्य, सहसचीव सुभाष पारे, सोपान शिंदे, अ‍ॅलेक जॅकब, कोषाध्यक्ष विजय गाडेकर, कार्यकारीणी सदस्य राजेभाऊ मगर, साजेद नजाब, देवा चित्राल, ऋषींद्र डोंगरे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आलेली आहे.
पिथीयन कॉन्सीलच्या माध्यमातुन क्रीडा प्रकारातच नव्हे तर कला, साहित्य व सांस्कृतीक प्रकारात सुद्धा जिल्ह्यातील खेळाडु, कलाकार यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल असे नव निर्वाचीत कार्यकारणीने यावेळी स्पष्ट केले असुन याचाच एक भाग म्हणुन लवकरच जालना पिथीयन फेस्टीवल आयोजीत करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील स्पोर्टस क्लब, डान्स क्लब, गायन, वादन, कला क्षेत्रातील शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी, खेळाडु, कलाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ही यावेळी नवनिर्वाचीत कार्यकारीणीने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे