pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 618 प्रकरणे निकाली

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.4

दि. 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांने निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेश अनादरण संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपुर्व वसूली प्रकरणे, कौटूंबित वादाची प्रकरणे, बी.एस.एन.एल. ची दावा दाखल पुर्व प्रकरणे, यासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते व तशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. या राष्ट्रीय लोक अदालमध्ये एकुण 618 प्रकरणे निकाली निघाली. या प्रकरणात तडजोड रक्कम 14,95,03,462.29 एवढी झाली.
या लोकअदालतसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी 9 पॅनल ठेवण्यात आले. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशंनी काम पाहिले तसेच पॅनल सदस्य म्हणुन सन्माननीय विधिज्ञांनी काम पाहिले.
या लोकअदालमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्षा एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश-2 एस. आर. तांबोळी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता भारसाकडे, सर्व न्यायाधीश, पॅनल सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कौटुंबिक न्यायालय येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 5 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.त्यामधील 1 प्रकरणातील जोडप्याने परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. पक्षकारांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सदरचे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाली.
पॅनल सदस्य म्हणुन मान्यवर विधीज्ञांनी काम पाहिले तसेच सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.
या लोकअदालमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण वर्षा एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश-2 एस. आर. तांबोळी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता पी. भारसाकडे, सर्व न्यायाधीश तसेच सर्व विधिज्ञ यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
मदतीसाठी सरसावले न्यायाधीश
जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे होत असलेल्या लोक अदालतमध्ये विविध प्रकरण ठेवण्यात आली होती. यातील एका प्रकरणातील अर्जदार तडजोडीच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात आल्या. परंतु त्यांना पायऱ्या चढणे शक्य नसल्याने त्या न्यायालयाच्या आवारातच बसून होत्या. सदर बाब त्यांच्या वकीलांनी कळविल्यानंतर स्वत: सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम. आर. खनवे, पॅनल सदस्य ॲङ जे.एस. भुतेकर, ॲड ए.डी. मते तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी अर्जदार यांच्याकडे येऊन त्यांच्या प्रकरणात तडजोड नोंदवली. यावेळी जिल्हा न्यायाधीश-2 एस. आर. तांबोळी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे वाघ उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे