pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आष्टी तालुक्यांतील भारसवाडा येथे अव्यद्या गावठी दारू चा महापूर

0 3 1 4 1 5

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.19

वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला तरीदेखील दारूचे वाहणारे पाट कमी होत नाही
दारूची अवैधपणे विक्री करण्यात येत असते. गावात होत असलेली विक्री थांबविण्यासाठी महिलांकडून एल्गार पुकारत गावात दारूबंदी करण्यात येत असते. तरी देखील छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच असते. अशाच प्रकारे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ७ हजार ४७६ अवैध दारूविक्री व दारू वाहतुकीच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. अर्थात दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे वास्तव पाहण्यास मिळत आहे.
वर्धा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. परंतु अष्टीच्या वार्धेत दारूचा महापूर यामुळे दारूबंदीचा जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. असे असताना देखील जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, तरीदेखील दारूचे वाहणारे पाट कमी होताना दिसून येत नाही. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे छुप्या पद्धतीने अवैधपणे दारूची विक्री होताना दिसत आहे. लज्जास्पद! मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडं केली शरीरसुखाची मागणी; प्राचार्याचा पालकांनी कुटलं
पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारू विक्री
वर्ध्याच्या जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील अनेक दारू- विक्रेत्यांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरी देखील काही मुजोर दारू विक्रेते पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दारू विक्री करताना दिसतात. गल्लीबोळात सुरू असलेल्या दारू दुकानांमुळे त्रस्त झालेल्या काही गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात दारुविक्री करतअसल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिला पोलिस ठाण्याला फोन करून माहिती देता. गावकऱ्यांच्या दबावाखातर पोलिस संबंधित दारूविक्रेत्याला पोलिस ठाण्यात नेतात. मात्र, त्याच्यावर योग्य कलम लावल्या जात नसल्याने एका दिवसातच त्याची सुटका होते. परिणामी, दारू विक्रेत्यांची हिम्मत अधिकच वाढत चालली आहे बीड हादरल लंपोलीस चौकीसमोरच तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना
२९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत आष्टी तालुक्यासह जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. दरम्यान वर्धा जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण ७ हजार ४७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात एकूण तब्बल १ हजार ११४ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलिसांनी कारवाई करत २९ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्ह्यात अनेक पोलिस अधिकारी येऊन गेले, त्यांनी त्यांच्या स्तरावर दारूविक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला. काहींचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी- देखील झाला. अनेकांनी दारूची दुकाने बंद केली. काहींनी जिल्हा सोडला. व्यवसाय बदलवला. मात्र, आता पुन्हा दारूची दुकाने खुली झाल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे