शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत हदगांव ते कपीलधारा पदयात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.6
हदगांव शहरांतील महादेव मठाचे मठाधिपती सदगुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हदगांव आखाडा बाळापुर ते श्री संत शिरोमणी ममन्थ स्वामी श्रीक्षेत्र कपिलधार भव्य दिव्य पदयात्रेला सोमवार चार नोव्हेबर रोजी हदगांव शहरांतील महादेव मठातुन मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात पदयात्रेला सुरुवात झाली.
हदगांव शहरात पिंपळगाव येथील महादेव मंदिराचे मंहत व्यकंट स्वामी महाराज, श्रीदत्त मंदिराचे मंहत गोपाळ गिरी महाराज, श्रीकृष्ण मंदिराचे मंहत योगीराज बाबा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भक्त मंडळीच्या उपस्थितीने हदगांव शहरांतून कपिलधार कडे रवाना झाली.यावेळी पदयात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
पळसा येथे सचिन लाहोटी यांच्या शेतात बाळासाहेब चिंचोलकर यांच्याकडुन चहा फराळ झाला. गावात भक्त मंडळीकडुन जंगी स्वागत करीत शाहू महाराज परभणी विद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक बंडोपंत चिंचोलकर व शिवानंद मुळावकर यांच्याकडुन महाप्रसाद संपन्न झाला. सांयकाळी करमोडी गावक-याकडुन महाप्रसाद व मुक्काम करून पदयात्रा बाळापुर कडे रवाना झाली.