आपल्या हक्काच्या लढ्यासाठी ओबीसी समाजाने एकजुटीने राहुन ताकद दाखवावी ओबीसी नेते पि.टी.मुंडे
कवाना येथील दत्तात्रय अंनतवार यांचे उपोषण अकराव्या दिवशी सुटले प्रशासनाकडून निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर यांची उपस्थिती

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.31
दत्तात्रय अनंतवार हे मराठा समाजाला दिल्या गेलेल्या ओबीसी प्रमाणपत्र सरसकट रद्द करण्यात यावेत यासाठी रविवार एकेवीस जुलै पासून कवाना ता.हदगांव आपल्या गावी अमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास बुधवार एकतीस जुलै रोजी अकरावा दिवस आहे.या उपोषणाने हदगांव हिमायतनगर सह आजुबाजुच्या तालुक्यातील ओबीसी समाज एकवटल्याचे चित्र दिसून आले.
अंनतवार यांच्या उपोषणाकडे तालुका प्रशासन वगळता जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतीनीधी जिल्हा प्रशासनाने पाठ फिरवल्याने रोष व्यक्त करीत ओबीसी बांधवानी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा बायपास वर रास्ता रोको तामसा बाजारपेठ हिमायतनगर शहर कडकडीत बंद पाळला.तर बुधवार एकतीस जुलै रोजी हदगांव कडकडीत बंद पाळण्यात आला.
निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे नांदेड उपविभागीय अधिकारी यांनी तालुका प्रशासन घेऊन उपोषणास भेट दिली.
बुधवार एकतीस जुलै रोजी ओबीसी नेते पि.टी.मुंडे हरीभाऊ शेळके यांनी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवासह कवाना ता.हदगांव येथील उपोषणास भेट देऊन उपोषणाकडे पाठ फिरवलेल्या पालकमंत्र्यासह अकरा दिवस अमरण उपोषणाच्या शासनाच्या उपोषणाविषयीच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत तब्बेतीसाठी उपोषण माघार घेत कायम लढा चालु ठेवु भुमिका घेतली.
यावेळी उपस्थित समाज बांधवाना ओबीसी नेते पि.टी.मुंडे यांनी ओबीसी समाज बांधवानी संविधानाने दिलेले हक्काचे आरक्षणासाठी एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन केले.तर यावेळी उपस्थित समाज बांधवानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून तहसीलदार विनोद गुडंमवार सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दररोज संपर्कात होते. दत्तात्रय अंनतवार यांनी उपस्थित ओबीसी नेते पि.टी.मुंडे हरीभाऊ शेळके यांच्यासह ओबीसी समाज बांधवाचे आभार मानत सर्वाच्या आग्रहास्तव अमरण उपोषण सोडले असले तरी समाजासाठी यापुढे लढा सुरूच राहील असे सांगीतले.