pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करावेत

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.7

जालना तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शहर विभागातील सर्व संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपण विहीत नमुन्यात हयात प्रमाणपत्र शुक्रवार दि. 30 जून 2023 पर्यंत तहसील कार्यालय, जालना येथे सादर करावेत. असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.
संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी जालना यांचे पत्रानूसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी दि. 30 जून 2023 पर्यंत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांचेकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जुन या कालावधीत उत्पन्नाचा दाखला व हयात प्रमाणपत्राचा दाखला घेणे सक्तीचे असल्याचे नमूद असून हयात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखलासह सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. एप्रिल ते जुन या कालावधीत हयात प्रमाणपत्र व अनुषंगिक सर्व आवश्यक कागदपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसहाय्य बंद करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने लाभ न मिळाल्यास त्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील. जालना शहरातील लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हयात प्रमाणपत्र संजय गांधी शहर विभाग, तहसील कार्यालय, जालना येथे सादर करावे. जेणेकरून संबंधित लाभार्थ्यांना विहीत वेळेत लाभ देता येईल. असे तहसीलदार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4