ब्रेकिंग
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास दि. 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
0
3
1
0
5
6
जालना/प्रतिनिधी,दि. 9
सन 2023-24 साठी केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून दि. 1 ऑक्टोबर पासून स्विकारणे सुरू आहे. दोन्ही योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी दि. 30 नोव्हेंबर 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. ही योजना पुर्णपणे केंद्र पुरस्कृत असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येते. अशी माहिती शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय, (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे ०१ डॉ. महेश पालकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
0
3
1
0
5
6