pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.11

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (ART COLLEGS) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी ०१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा आहे. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावल्या ‘मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आलेले आहे.

सदर स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी, (२) मताधिकार लोकशाहीचा स्तंभ (३) एका मताचे सामर्थ्य, (४) सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, (५) लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे.

सदर स्पर्धासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. १,००,००० रु. दुसरे पारितोषिक ७५,०००, तिसरे पारितोषिक ५०,००० रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १०,००० रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५०.००० रु. दुसरे पारितोषिक २५.०००रु. आणि तिसरे पारितोषिक १०.००० रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५.००० रुपयांची आहेत.. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५,००० रु. दुसरे पारितोषिक १५,००० रु. तिसरे पारितोषिक १०,००० रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५.००० रुपयाची आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे