pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बदनापूर तालुक्यातील शाळेत संकल्प पत्राचे वाटप

0 1 7 4 0 9

बदनापूर/प्रतिनिधी, दि.26

बदनापूर येथे तालुका निवडणूक कक्ष यांच्या उपक्रम अंतर्गत तालुक्यातील 155 जि. प. शाळा व इतर शाळा मधील 15000 विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप आज  केंद्रप्रमुख व शाळा मुख्याध्यापक मार्फत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या 115 शाळा व इतर खाजगी अनुदानित व विनाअनुदानित  शाळांचा या मध्ये सहभाग घेतला आहे. जवळपास 15000 विद्यार्थी आज (दि.26) सकाळी १० वाजता या संकल्प पत्राचे वाटप झाले आहे. धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची जवाबदारी मी पार पाडेन असे विद्यार्थी यांच्या आई/वडील/बाबा/आजी/काका/का की/भाऊ/ताई यांनी या वेळी संकल्प केला आहे व अशा प्रकारचे 15000 पत्र जालना जिल्हाचे मा. जिल्हाधिकारी श्रीकृष्णकांत पांचाळ यांना पाठवले जाणार आहेत. तसेच भारतीय घटनेने मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे त्या अधिकारा चा कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी करणार असा संकल्प सर्व शालेय पालकांनी या वेळी घेतला आहे. यावेळी केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी व पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे