जालना तालुका युवासेनेच्या वतीने रविवारी
जालन्यातील शिवसेना भवनात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सडेतोड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,जालना विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश काळे,भोकरदन विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रपाल चांदेलिया, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, अश्विन अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, शहरप्रमुख घनश्याम खाकिवाले, शहरप्रमुख दुर्गेश कठोठीवाले, विधानसभा समन्वयक दीपक रणवरे,युवासेना शहरप्रमुख अंकुश पाचफुले यांची उपस्थिती होती.यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, आजच्या या डिजिटल जमान्याच्या युगामध्ये वाचन कमी होऊ लागलेले आहे.विद्यार्थ्यांना वाचनाची खूप आवश्यकता आहे, जो खूप वाचन करतो तो खूप चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त करू शकतो आपली मते मांडू शकतो असे,सांगून ते म्हणाले की, अत्यंत छोट्या-छोट्या स्पर्धेमधूनच मोठे मोठे वक्ते घडत असतात. मी ही अत्यंत छोट्या गावातून येऊन देशातील सर्वात मोठ-मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठावर भाषणे केली. याचे रहस्य म्हणजे वाचन व समाजात वेळोवेळी घडणार्या घडामोडी समजून घेऊन त्यांचे निरीक्षण हेच असल्याचे सांगीतले.
आपल्या भाषणातून त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या कवाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल बोलताना ते म्हणाले की,
जिल्ह्यातील ते अत्यंत चांगले वक्ते असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी ही अशी स्पर्धा असल्याचे सांगून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.यावेळी स्पर्धकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जालना
विधानसभा संपर्क सुरेश काळे, यांनीही शुभेच्छा दिल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत सहभागी सर्वच स्पर्धकांनी खूप चांगल्या रीतीने आपली
मते व्यक्त केली. अनेकांनी आपले विषय ओघवत्या शैलीत विचार मांडताना श्रोत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडले तर अनेकांनी आपल्या भाषणांनी
समोरच्यांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेत तालुक्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेUत अदिती सुरंगळीकर हिने प्रथम क्रमांक पटकावत अकरा हजार रुपये रोख
व सन्मानचिन्ह,हर्षद व्यवहारे याने द्वितीय क्रमांक मिळवून पाच हजार
पाचशे रुपये रोख व सन्मानचिन्ह तर वैष्णव वाढेकर याने तृतीय तर शुभम
शिंदे याने उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
तालुका उपप्रमुख रामचंद्र गायकवाड, सोशल मीडिया समन्वयक राजेश शेळके,बंडू
केळकर, विशाल वाघमारे, संजय गिराम,भगवान राऊत,दिलीप गिराम यांनी प्रयत्न
केले. स्पर्धेचे परीक्षण मनीषा पाटील व डॉ.प्रा.दिपक चाटे केले तर
स्पर्धेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन युवासेना तालुकाप्रमुख संदिप मगर
यांनी केले
———————————————————
१४-जालना तालुका युवासेनेच्या वतीने रविवारी जालन्यातील शिवसेना भवनात
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सडेतोड
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
००००००००००००००००