pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौर व पारंपारिक फेर नृत्य स्पर्धेचे आयोजन.

0 1 2 1 1 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा व महिलांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केअर ऑफ नेचर सामाजिक संख्या वेश्वि महाराष्ट्र राज्य तर्फे गुरुवार दि 12/10/2023 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता श्री साई देवस्थान, साई नगर,वहाळ ता: पनवेल. जि. रायगड येथे महिलांसाठी मंगळागौर व पारंपारिक फेर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 7000 रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 5000 रू व सन्मान चिन्ह , तृतीय क्रमांकांस 3000 रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आणि ढोलकीच्या तालावर फायनललिस्ट स्नेहा पतील हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सदर स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. महिलांसाठी आयोजित केलेल्या या मंगळागौरी व पारंपारिक फेर नृत्य स्पर्धेत महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.अधिक माहितीसाठी अमृत म्हात्रे फोन नंबर – 9930932350 येथे संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2