सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रशेठ मुंबईकर यांच्या तर्फे शिवसंकल्प समालोचक असोशिएशनच्या सर्व सदस्यांना जर्सी भेट.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
शिवसंकल्प समालोचक असोशिएशन ही समालोचन आणि निवेदन करणारे सर्व सुत्रसंचालक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थी वृत्तीने विविध उपक्रम राबविले गेले आहेत. सध्याही विविध समाज हिताचे उपक्रम कार्यक्रम सुरु आहेत. समालोचक निवेदक केवळ समालोचन आणि निवेदनच करतात असे नाही तर अनेक व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची महती किंवा एखाद्या कलाकारांची महती सांगून त्याला प्रसिद्धी देत असतात, हे समालोचक दिवस रात्र असे अनेक उपक्रम राबवत असतात, शिवसंकल्प समालोचक असोशिएशनच्या या पारदर्शक व निस्वार्थी वृत्तीच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत उरणमधील वेश्वी गावचे सुपुत्र माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रशेठ मुंबईकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत शिवसंकल्प समालोचक असोशिएशनच्या सर्व सदस्यांना जर्सी भेट दिली आहे. थंडिपासून संरक्षण व्हावे यासाठी सर्व सदस्यांना तिरंगा रजनी क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जर्सी देण्यात आले. या दानशूरपणाचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी कौतूक करत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रशेठ मुंबईकर यांचे आभार मानले आहेत.