pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सिपोरा अंभोरा जिल्हा परिषद सर्कल मधुन काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास पक्षाचा झेंडा फडकावणार. डॉ. राहुल संतोष हिवाळे

0 3 8 6 5 4

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असून आतापासूनच या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्याला पक्षाकडून तिकीट कसे मिळेल यासाठी वरीष्ठ नेत्यांकडे जोर लावला आहे. जाफ्राबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा जिल्हा परिषद सर्कल हे अनुसूचित जाती महीला साठी राखीव असल्याने या सर्कल मधुन काँग्रेस पक्षाचे जाफ्राबाद तालुका अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष श्री राहुल संतोष हिवाळे त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलाबाई संतोष हिवाळे यांच्या साठी पक्षाकडे प्रबळ व सक्षम उमेदवार म्हणून उमेदवारी साठी मागणी केली आहे. डॉ. राहुल हिवाळे हे काँग्रेस पक्षाचे फार जुने कार्यकर्ते असुन पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. तसेच त्यांनी जाफ्राबाद तालुका उपाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग, तालुका जाफ्राबाद अशी पदे भूषविली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हिवाळे परिवार धार्मिक व समाज कार्यात नेहमी अग्रेसर असून सर्कल सह तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असुन राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अभिनव क्रिडा मंडळ व व्यायाम शाळा यांच्या माध्यमातून सर्कल सह जाफ्राबाद तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पक्षाने आपणास संधी दिल्यास काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे