अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडणार नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा,

मोर्शी तालुका/प्रतिनिधि,दि.20
विदर्भातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या म्हणजेच अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात ९३ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यातील धरणातील अपेक्षित पाणी पातळी पूर्ण होताना दिसत आहे. पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार असून हा निर्णय घेण्यात आला आहे.20 ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ८०३ घ. मी. प्र. से. इतका येवा धरणात येत असून धरणाचे जवळपास दरवाजे उघडण्यात येणार आहे. ३०० घ. मी. प्र. से. चा विसर्ग सोडण्यात येणार आहे. प्रकल्पात येणाऱ्या येव्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे व कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे



