ज्योतिर्लिंग त्रिंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक स्थापन करण्याबाबत निवेदन सादर!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचे स्मारक उभारावे: मल्हारश्री अनिल भालेकर

प्रतिनिधी/अंबड,दि.10
नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री.त्र्यंबकेश्वराचे अत्यंत धार्मिक महत्त्व असणारे त्रिंबकेश्वर या ठिकाणी आहे.या ठिकाणी असणारी मंदिर भव्य असून रेखीव कलाकृतीने युक्त आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारे हे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 1789 मध्ये केला आहे.
परंतु शोकांतिका म्हणावशी वाटते की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केलेले या मंदिरा बाबत, त्यांच्या महान कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून या ठिकाणी स्मारक नाही. ज्या मंदिरामध्ये भारतातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला असताना त्यांच्या महान कार्याचे कृतज्ञ न होणे हे अत्यंत खेद जनक आहे.
याच संदर्भात मल्हार महासंघाचे राज्यसचिव तथा सहशिक्षक पत्रकार मल्हारश्री: अनिल भालेकर यांनी अंबड तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहमंत्री,गृहसचिव,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व्यवस्थापक, श्री त्रिंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांना मंदिर परिसरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक स्थापित करण्याबाबत निवेदन सादर केले.
स्मारक उभारणीसाठीचा हा लढा या निवेदनाद्वारे सुरुवात असून येत्या काही दिवसात पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. तसेच आझाद मैदानावर आमरण उपोषण द्वारे हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढला जाईल असे मल्हारश्री अनिल भालेकर यांनी सांगितले आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, प्रजाहितकारी, निस्वार्थ लोकाभिमुख महान कार्याचे स्मरण होऊन कृतज्ञता व्यक्त करून नतमस्तक होणे आपल्या सर्वांचे कर्तव्य बनते. त्यांच्या महान कार्यातून कृतज्ञ होण्यासाठी या मंदिर परिसरामध्ये भव्य स्मारक उभारणीसाठी प्रशासन तसेच सरकारने लोकभावना विचारात घेता, कार्य तत्परता दाखवत लवकरात लवकर स्मारक उभारावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.