पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर!

जालना/प्रतिनिधी,दि.25
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.25 जानेवारी 2025 रोजी रात्री 9.20 वाजता वाहनाने शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन राखीव व मुक्काम करतील.
रविवार दि. 26जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथून शासकीय वाहनाने पोलिस मुख्यालय मैदान जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 9.15 वाजता पोलिस मुख्यालय मैदान जालना येथे आगमन व भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना, राष्ट्रीय गुणवत्ताप्राप्त खेळाडूंचा सन्मान, क्रीडा क्षेत्रातील विशेष पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या सत्कार समारंभास उपस्थिती. सकाळी 9.55 ते 10.40 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक व मान्यवरांच्या भेटी, देशभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण, पार्थ सैनिकी शाळा जालना यांचे मल्लखांब कवायत, आभार प्रदर्शन व समारोप. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित. सकाळी 11.30 वाजता जालना जिल्ह्यातील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या विविध प्रश्नासंदर्भात क्षेत्रीय अधिकारी व विविध औद्योगिक संघटनासमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता पशुसंवर्धन विभागाच्या विविध प्रश्नासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक.. सोईनूसार ड्रायपोर्ट प्रकल्पास भेट व छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.