pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव आवटी यांचा विशेष सन्मान

0 3 8 6 5 3

जाफराबाद /विशाल देशमुख,दि.8

“मान्सून कला प्रदर्शनात ”
अजंठा चित्रकला महाविद्यालय जालना व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनात राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.. विशेष म्हणजे या चित्रकला प्रदर्शनामध्ये त्यांनी विशेष भूमिका निभावलेली होती. नुकत्याच झालेल्या पर्यटन विकास संचालनालय मार्फत भरविण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेचे विशेष परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मराठवाड्यातून तसेच जालना जिल्ह्यातून एकमेव चित्रकला परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव आवटे यांची निवड झालेली होती. टेंभुर्णीकरांच्या इतिहासामध्ये हा एक मानाचा तुरा खोवला होता. यापूर्वी संतोष बाबुराव यांनी अखिल भारतीय विश्व शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये, आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्यांचा या चित्राच्या माध्यमातून विश्व शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या आधारावर त्यांनी चित्र प्रदर्शन भरवलेलं होतं. त्यांच्या चित्रपटदर्शन दालनाला अनेक मान्यवरांनी सुद्धा भेट दिली होती. या सर्वांचाच परिपाक म्हणजे वरील चित्रप्रदर्शनामध्ये संतोष बाबुराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तुमच्या या सन्मानाबद्दल आदर्श शिक्षक शेख जमीर सर, नसीम शेख, उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, विश्वनाथ सांगोळे, नसीम शेख संजय राऊत, मुकुंद आवटी अलके सोमानी, तसेच स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी, तसेच व्यवस्थापक सागर सपकाळ, रामेश्वर सांगळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे