कापूस पिकामध्ये मूल्यवर्धन महत्वाचे- श्री.जी आर.कापसे

विरेगाव/गणेश शिंदे, दि.31
कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उद्योगाभिमुख अभ्यास दौरे व शेतकरी प्रशिक्षण , गटशेतीसह जोडधंदा, पिकांचे व्यवस्थापन आदी उपक्रमांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आत्माच्या माध्यमातून केले जाते, आत्माचे प्रकल्प संचालक श्री जितेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव हडप येथे कापूस कीड रोग व्यवस्थापन व कापूस भाव जोखीम व्यवस्थापनावर आधारित शेतकरी प्रशिक्षण पार पडले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री गहिनीनाथ कापसे ,कृषी विज्ञान केंद्र चे अजय मिटकरी,नाबार्ड चे तेजल क्षीरसागर ,स्मार्ट चे श्रीकांत देशपांडे ,एम सी एक्स च्या दक्षा जानी यांच्यासह प्रगतीशील शेतकरी भगवान डोंगरे ,आत्माचे दत्तात्रय आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री गहिनीनाथ कापसे होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी कसा करावा ,रासायनिक शेतीच्या विळख्यातून बाहेर पडून शेतकर्यांनी घरच्या निविष्ठा वापर करण्याच्या सल्ला दिला .मानवी आरोग्यासोबातच जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले कापूस पिकातील आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपययोजना त्यांनी सांगितल्या .कृषी विज्ञान केंद्राचे अजय मिटकरी यांनी कापूस व सोयाबीन कीड रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले व गुलाबी बोंडअळी ,या विषयावर मार्दर्शन केले तर श्रीकांत देशपांडे यांनी स्मार्ट कॉटन बाबत माहिती दिली शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धन रुजावे त्यांनी कच्चामाल विक्री करू नये यासाठी राज्यात विविध पिकासंदर्भात अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारा स्मार्ट प्रकल्प त्याच धोरणाचा भाग आहे. असेही श्री देशपांडे यांनी सांगितले . दक्षा जानी यांनी सर्वच कापसावर बहुतांश वेळा एकत्र प्रक्रिया केली जाते. यात कमी आणि उच्च दर्जाचा कापूस मिसळतो. उच्च प्रतीच्या कापसाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी गट तयार झाले व त्यांनी एकच वाण वापरले तर एकाच गुणवत्तेचा कापूस तयार होईल. त्यांना भाव चांगला मिळेल असे सौ दक्षा जानी यांनी बोलताना सांगितले.यावेळी आत्माचे अर्जुन मद्दलवार ,प्रमोद जाधव ,बळीराम कडपे ,कृषी सहायक वानखेडे ,पर्यवेक्षक श्री ढगे ,सचिन गोल्डे ,शरद खेडेकर ,आयडियल अँग्रीटेक प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते स्मार्ट कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता .