जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.8
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना मार्फत जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाकडून जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. तरी जालना जिल्ह्यातील युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी 2023-24 साठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा युवा पुरस्कार जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतींना प्रत्येकी रोख रक्कम रूपये 10,000/-, गौरवपत्र सन्मानचिन्ह तसेच संस्था ह्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रॅस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रूपये 50,000/-, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 15 एप्रिल 2025 पर्यंत परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यालयीन वेळेत स्पीड पोस्टाने सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे (7758863991), क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम (8975333594) अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे