संत नंदी महाराज यात्रेनिमीत्य भजन , शालेय लेझीम ,कब्बडी स्पर्धेसह ,विविध कार्यक्रम भक्त मंडळी राजकीयसह प्रशासनाची उपस्थिती

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29
नांदेड जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील भाविकाचे श्रधास्थान धार्मिक सामाजिक कार्यक्रमासह लेकीबाळीचा उत्सव म्हणून असलेला मौजे कवाना ता.हदगांव येथे नंदी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार चोवीस जानेवारीपासून सप्ताहास सुरुवात झाली असून मंगळवार तिस जानेवारी रोजी सप्ताह समाप्ती होणार आहे.बरडशेवाळा माजी सरपंच मारोतराव मस्के नाईक यांचा महाप्रसादानंतर कवाना यात्रेला सुरुवात होणार आहे.
भजन स्पर्धा एकतीस जानेवारी माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांच्यासह मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.दोन फेब्रुवारी खासदार हेमंत पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह तालुका जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत शालेय लेझीम स्पर्धा संपन्न होणार आहे.तर आमदार माधवराव पाटील जवळगावकर डॉ अंकुशराव देवसरकर यांच्यासह मान्यवराच्या उपस्थितीत शनिवार तिन फेब्रुवारी रोजी कब्बडी स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेत राजकीय क्षेत्रासह विविध मान्यवरांकडुन मोठ्या प्रमाणात बक्षीसे असल्याने अनेक भजन शालेय लेझीम कब्बडीचे संघ सहभागी होतात. स्पर्धेसह यात्रेनिमीत्य आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रमाला राजकीय सामाजिक क्षेत्रासह तालुका जिल्हा प्रशासनासह अधिकरी कर्मचारीवर्ग भक्त मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक संस्थान समिती गावकरी मंडळींनी दिली आहे. गर्दी लक्षात घेऊन मनाठा पोलीस प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मनाठा पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांनी दिली.