pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था संचालित सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 13

टेंभुर्णी येथील विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट…
टेंभुर्णी:- जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था संचालित सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी नेहमीच विद्यार्ध्यांना विकसित करण्याकरीता वेगवेगळ्या उपक्रमांमधून प्रयत्न करीत असते, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी येथील द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी येथे वैद्यकीय भेट घेऊन तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. ज्यात विद्यार्थ्यांनी रुग्णांची भेट घेत हॉस्पिटल मधील मेडिकल स्टोअर्स, बाह्य रुग्ण विभाग, जळीत विभाग, क्ष-किरण विभाग, अपघात विभाग, प्रसुती विभाग व वेगवेगळ्या विभागांची माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल देशमुख सर डॉ.अमोल वाघ सर, डॉ. सुभाष शिंगणे सर, परिचारिका प्रांजल खराटे, संजय पकाळे, लॅब टेक्निशियन कृष्णा वानखेडे, संगीता आढाव, सुर्वे सर, राहुल उमप, सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मासिचे प्रा. एस.एन.सोनसाळे, प्रा.पी.पी. बनकर ई. उपस्थित होते,
संस्था अध्यक्षा डॉ. सौ. सुरेखाताई संजयजी लहाने, सचिव श्री. संजयजी लहाने सर, सह सचिव. श्री सुयश भैया संजयजी लहाने,प्राचार्य एम.एन.पठाण सर, विभाग प्रमुख प्रा. अर्पित राजाराम सुरळकर यांनी संपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे