pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भूखंड दस्तावेज दयायचे नसेल तर घरपट्टी परत देण्याची हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची मागणी

0 1 7 4 0 8

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

उरण तालुक्यातील जे. एन.पी. टी आंतर राष्ट्रीय बंदर(जेएनपीए ) प्रकल्पासाठी जुना शेवा कोळीवाडा गावातील जमीनी संपादित करण्यात आल्या.जमीन संपादन करताना या जूना शेवा कोळीवाडा गावातील नागरिकांचे उरण तालुक्यातील मोरा रोडवर हनुमान कोळीवाडा येथे पुनवर्सन केले.मात्र हनुमान कोळीवाडा गावातील वातावरण राहण्यास योग्य नाही. हनुमान कोळीवाडा गावातील सर्व घरांना वाळवी लागली आहे. हे घरे राहण्या लायक नाही असा अहवाल शासनाने नेमलेच्या टाटा संस्थेच्या समितीने शासनाला कळविले होते.मात्र येथे नागरिक जीव मुठीत धरून आजही जगत आहेत.गेली ३८ वर्षापासून येथील नागरिक पुनर्वसनच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र अजूनही, आजतागायत पुनवर्सन न झाल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यातच हनुमान कोळीवाडा गाव व ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा हे बेकायदेशीर आहेत हे माहिती अधिकारातून सिद्ध झाल्याने एन. एस. पी.टी विस्थापित शेवा कोळीवाडा भूखंड धारकास शासनाने दिलेला दस्तावेज दयायचा नसेल तर ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ने घेतलेली घरपट्टी , मुददल व व्याजासहीत ग्रामस्थांना परत करावेत अशी मागणी ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश भास्कर कोळी यांनी तसेच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी उरणचे तहसिलदार उध्दव कदम व ग्रामसेविका सुप्रिया घरत यांच्याकडे केली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की श्रीमती सुप्रिया दीपक घरत ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी, ग्रामपंचायत हनुमानकोळीवाडा यांनी दि.१२/०८/२०२२ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १२ मार्च १९८७ रोजी एनएसपीटी प्रकल्पामुळे विस्थापित केलेल्या शेवा कोळीवाडा या गावाला महसुली गाव हनुमानकोळीवाडा या नावाने ओळखतील असे जाहीर केलेले आहे. त्या नुसार विस्थापित हनुमान हनुमान कोळीवाडा कोळीवाडा गावातील भूखंड धारक गावात नवीन ग्रामपंचायत स्थापना करून दिली होती.त्या वेळी हनुमान शेतकरी ८८ व बिगर शेतकरी १६८ मिळून २५६ कुटूबे यांची यादी सह एकूण १७ हेक्टर जमिनीचा मौजे हनुमान कोळीवाडा गाव वहिवाट नकाशा व आकारबंध आणि गाव नमुना नंबर ७/१२ व ८अ वर भोगवटादार नोंद करून वगैरे वगैरे नवीन ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना शासनाने दस्तावेज दिलेला आहे. तो संपूर्ण दस्तावेज मागितला होता. त्यावर दि. २४/०८/२०२२ रोजी मा. श्रीमती सुप्रिया दीपक घरत ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी, ग्राम पंचायत हनुमान कोळीवाडा यांनी दिलेल्या माहितीत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायती मध्ये आवश्यक असलेले दस्तावेज उपलब्ध नाहीत असे लेखी लिहून दिले आहे.

एक्षिबीट ए च्या पत्रकात दिलेल्या दस्तावेजाच्या पुराव्या वरून ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा आणि हनुमान कोळीवाडा गाव हा कायदेशीर नाही. हे सिद्ध केलेले आहे. ग्राम पंचायत हनुमान कोळीवाडा यांच्या कडे भूखंडाचा आकारमानाचा दस्तावेज नसताना त्यांनी आकारलेली घरपट्टी आणि वसूल केलेली घरपट्टी ही बेकायदेशीर आहे. असे ग्रामसेविकाने दि. २४/०८/२०२२ रोजी दिलेल्या माहितीतून सिद्ध होते.त्यामुळे तहसीलदार उद्धव कदम यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. एनएसपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा भूखंड धारकास शासनाने दिलेला दस्तावेज द्यावा नसेल तर घेतलेली घरपट्टी मुद्दल व व्याजासहित परत करावी अशी मागणी रमेश कोळी तसेच सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार उद्धव कदम,ग्रामसेविका सुप्रिया घरत यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे